26 जणांना न्याय मिळणार; दहशतवाद्यांचे फोटो आले समोर
पहलगाम : खरा पंचनामा
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवाद्यांचे फोटो आता समोर आले आहेत. सैन्य आणि स्थानिक पोलिसांच्या विशेष टीमने या दहशतवाद्यांना पकड्यासाठी शोध मोहीत राबवित आहे.
आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात सहा दहशतवाद्यांचा समावेश होता. सुरक्षा एजन्सीने यापूर्वी दहशतवाद्यांचे तीन स्क्रेच प्रसिद्ध केले होते. केंद्रीय एजन्सीच्या सूत्रानुसार, प्रतिबंधित पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तोय्यबाशी संबंधित द रेजिस्टेंस फ्रंटने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
सैन्याच्या मोहिमेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली. अमित शाह घटनास्थळीही गेले होते. या हल्ल्यात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी आहेत.
द रेजिस्टेंस फ्रंट प्रतिबंधित पाकिस्तान स्थित लष्कर-ए-तैय्यबाचा (LET) एका प्रॉक्सी दहशतवादी संघटना आहे. ज्याचं गठण 2019 मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 हटविण्यात आलं होतं. याची सुरुवात एक ऑनलाइन युनिट होतं. मात्र तहरीक-ए-मिल्लत इस्लामिया आणि गजनवी हिंद सारख्या संघटना एकत्र येत ही संघटना दहशतवादी समूहात विकसित झाली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.