Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

घोड्यांमुळे वाचला 28 कोल्हापूरकरांचा जीव

घोड्यांमुळे वाचला 28 कोल्हापूरकरांचा जीव

पहलगम : खरा पंचनामा

जम्मू-काश्मीर येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामुळं संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर कित्येक जण जखमी आहेत.

काश्मीरमधील पहलगाम येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही महाराष्ट्रातील काही पर्यटक जम्मू-काश्मीरमध्ये अडकले आहेत. तर काही पर्यटक या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहेत.

कोल्हापूरातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या 28 पर्यटकांचा जीव वाचला आहे. पहलगाममध्ये पोहोचण्यासाठी घोडे वेळत उपलब्ध झाले नाही आणि यामुळेच या पर्यटकांचा जीव वाचला आहे. गोळीबार झालेल्या घटनेपासून अवघ्या दीड किमीवर हे पर्यटक उभे होते. त्यामुळं दैव बलवत्तर म्हणून या पर्यटकांचा जीव वाचला आहे, असंच आता म्हणावं लागेल. या 28 जणांच्या चमूला ट्रॅव्हल्स ड्रायव्हरने उधर फायरिंग सुरू है मत जाओ" हे सांगताच हे सर्व पर्यटक माघारी फिरले. या घटनेमुळे काळ आला होता पण वेळ आली नव्हती असा अनुभव या पर्यटकांना आला.

हा सर्व थरारक अनुभव जम्मू काश्मीर पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कुरणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आला आहे. कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातून काश्मीरच्या पर्यटनासाठी 28 जणांचा चमू गेला होता. मंगळवारी दुपारी पहलगाम पर्यटनासाठी जाण्यासाठी हे सर्वजण तयारी करत होते. ट्रॅव्हल्सने हे सर्वजण पहलगांपासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर पोहोचले होते.

28 जणांना एकाच वेळी घोडे उपलब्ध होण्यासाठी काही वेळ लागला. घोडे उपलब्ध होताच हे सर्वजण घोड्यावर बसू लागले. तेवढ्यात ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरने "उधर फायरिंग सुरू है मत" जाओ असं सांगताच या सर्वांना धक्का बसला. हे सर्वजण घोड्यावरून खाली उतरले. हे सर्व पर्यटक सुखरूप परतीच्या मार्गावर लागले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.