Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं

वाल्मिक कराडच्या तुरुंगातून आणखी 3 कैद्यांना हलवलं

बीड : खरा पंचनामा

वाल्मिक कराडला मारहाण केल्याचा ठपका ठेवत महादेव गित्ते आणि त्याच्या चार साथिदारांना बीड कारागृहातून हर्सल कारागृहात हलवण्यात आलं होतं. या मारहाणीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये हालचालींना वेग आला असून पोलीस विशेष खबरदारी घेताना दिसत आहे.

अशातच बीड जिल्हा कारागृहातील मारहाणीच्या घटनेनंतर बीड पोलिसांनी अक्षय आठवले, मनीष क्षीरसागर आणि सवाई यांना नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आले आहे.

बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी कराड गँग आणि महादेव गित्ते यांच्यामध्ये हाणामारी झाल्याचे समोर आलं होतं. महादवे गित्तेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर महादेव गित्तेसह इतर चार आरोपींना हर्सल कारागृहात हलवल्याची आलं. महादेव गित्तेला पोलिस व्हॅनमधून नेत असताना त्याने ही माहिती दिली. मारहाणीच्या घटनेनंतर महादेव गीते यासह इतर चौघांना संभाजीनगर येथील हरसुल कारागृहात हलवण्यात आले होते. दरम्यान, आज अक्षय आठवले यांच्यासह इतर दोघांना नाशिक कारागृहात पाठवण्यात आले.

मस्साजोग येथे काल (31 मार्च) मुस्लिम बांधवांनी ईद साजरी केली नाही. यावर्षी ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचा स्वर्गीय संतोष देशमुख यांचा मानस होता. परिणामी, काल मुस्लिम बांधवांना अश्रू अनावर झाले. मुस्लिम बांधवांचा मुख्य सण असून देखील त्यांच्यामध्ये सणाबद्दल उत्साह नव्हता. त्यांनी माझ्यासोबत दिवसभर वेळ घालवला. केज पोलिसांच्या हातात तपास असताना त्यांनी तो चोखपणे करण्याचा प्रयत्न केला नाही. केज पोलिसांनी कळंबच्या महिलेची चौकशी देखील केली नाही. त्या महिलेने अनेक लोकांना अडकवलं आहे. विशेष करून पीआय साहेबांनी केलेल्या दोन चुका आमच्या भावाला मृत्यूच्या तोंडात नेण्यास कारणीभूत ठरले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.