Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सांगलीच्या द्राक्ष विक्रेत्याला 36 लाखांच्या रोकडसह गोव्यात अटक

सांगलीच्या द्राक्ष विक्रेत्याला 36 लाखांच्या रोकडसह गोव्यात अटक

पणजी : खरा पंचनामा

कोकण रेल्वे पोलिसांनी एक मोठी कारवाई केली. करमळी रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांनी महाराष्ट्रातील एका द्राक्ष व्यापाऱ्याला तब्बल 36.5 लाखांच्या रोकडसह अटक केली. 

अवधूत तानाजी भोसले (वय, वर्ष 29) असे अटक करण्यात आलेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी विचारलेल्या प्रश्वांची तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही. अवधूत हा महाराष्ट्रातील असला तरी सध्या तो केरळमध्ये वास्तव्यास आहे.

दरम्यान, अवधूत मुंबईहून केरळच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत होता. करमळी स्थानकावर गस्त घालणाऱ्या कोकण रेल्वे पोलिसांनी अवधूतच्या बॅगची तपासणी केली असता त्याच्या या बॅगमध्ये 36.5 रोकड आढळली. यादरम्यान पोलिसांनी त्याला या पैशांबाबत विचारले असता त्यांना तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. त्यामुळे संशय आल्यानंतर पोलिस त्याला पुढील कारवाईसाठी मडगाव स्टेशनवर घेऊन गेले.

त्याने यादरम्यान पोलिसांना सांगितले की, तो ही रोकड केरळमध्ये घर बांधण्यासाठी घेऊन चालला आहे. मात्र पोलिसांना त्याच्या या सांगण्यावर विश्वास बसला नाही. याशिवाय, त्याच्याकडे कोणत्याही स्वरुपाची कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर कोर्टात हजर केले, परंतु कोर्टाकडून त्याला जामीन मिळाला. तथापि, आयकर विभागाने त्याला आता पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.