श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा कोथरूड मधील विविध भागात आयोजित सोहळ्यात सहभाग
पुणे : खरा पंचनामा
श्री स्वामी समर्थांच्या प्रकटदिनानिमित्त उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोथरूड मधील विविध भागात आयोजित प्रकटदिन सोहळ्यात सहभाग घेतला. स्वामींच्या कृपेने सर्वांच्या जीवनात शांती, समाधान आणि समृद्धी नांदो, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना त्यांनी यावेळी केली.
चंद्रकांत पाटील यांनी कर्वेनगर मधील स्वामी ओम प्रतिष्ठान, हिंगणे होम कॉलनीतील श्री साई समर्थ सेवाभावी संस्था, श्री गुरुदेव दत्तसेवा मंडळ ट्रस्टचे मन: शांती मंदिर आदी ठिकाणी जाऊन महाराजांचे दर्शन घेतले. तसेच, स्वामींच्या प्रकटदिनानिमित्त कोथरुड मतदारसंघातील शास्त्रीनगर मधील स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्व भक्तांना प्रसाद वाटप देखील केले.
स्वामी समर्थांच्या प्रकटदिनानिमित्त कोथरूडमधील राहुल नगरमध्ये स्वामींच्या चंदनी पादुकांचे आगमन झाले असून, त्यांचे दर्शन पाटील यांनी घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित सर्वांना स्वामी प्रकटदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.