बुधगाव येथे दोन ग्रामपंचायत सदस्यांसह तिघांवर हल्ला
सांगली : खरा पंचनामा
बुधगाव (ता. मिरज) येथील दोन ग्रामपंचायत सदस्यांसह तिघांवर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एक ग्रामपंचायत सदस्य गंभीर जखमी झाला आहे. पूर्वीच्या वादातून हा हल्ला झाल्याची चर्चा आहे. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे.
अविनाश विक्रम पाटील (३०) असे गंभीर जखमीचे नाव आहे. तर मनोहर वसंत पाटील (४०) आणि संभाजी रंगराव पाटील (४८, सर्व रा. बुधगाव) हे जखमी झाले आहेत. जखमी पाटील यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्या आई वैशाली पाटील या बुधगवाच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.
अविनाश पाटील हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. बुधगाव राजवाडा परिसरातील एका रस्त्याचे काम सुरू होते. विरोधी गटाच्या एकाने त्याठिकाणी आला. कामाची दर्जाची पाहणी केली. त्यानंतर ठेकेदार संभाजी पाटील यांच्याशी वाद घातला. त्यानंतर त्यांना मारहाणही करण्यात आली. सरपंचांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. हा जाब विचरण्यासाठी अविनाश पाटील हे संशयिताकडे गेले. त्यावेळी त्यांच्या पुन्हा जोरदार वादावादी झाली. वाद टोकाला गेल्यानंतर संशयिताने अविनाश पाटील यांच्या डोक्यात कोयत्याने वार केला. तसेच बाटलीनेही मारहाण केली. यावेळी मनोहर पाटील यांनाही मारहाण करण्यात आली. अविनाश हे रक्तबंबाळ अवस्थेत असताना तातडीने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले. शासकीय रुग्णालय परिसरात मोठी गर्दी होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.