सांगलीत दुचाकी चोरट्याला अटक
सांगली, कराडमधील गुन्हे उघड : विश्रामबाग पोलिसांची कारवाई
सांगली : खरा पंचनामा
विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत रात्रगस्त घालताना एका दुचाकी चोरट्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून सांगली आणि कराडमधील गुन्हे उघडकीस आले असून दोन दुचाकी जप्त केल्याची माहिती विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी दिली.
रामा विठोबा करांडे (वय ४३, रा. विजयनगर कोर्टाजवळ सांगली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती. त्यातील चोरट्याला पकडण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.
पथकातील प्रशांत माळी, आर्यन देशिंगकर यांनी रात्रगस्त असताना करांडे याला संशयावरून ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने ती सिव्हिल हॉस्पिटल परिसरातून चोरल्याची कबुली दिली. शिवाय कराड येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
विश्रामबागचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक चेतन माने, संदीप साळुंखे, अमर मोहिते, बिरोबा नरळे, महमद मुलाणी, प्रशांत माळी, योगेश पाटील, आर्यन देशिंगकर, गणेश बामणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.