एकनाथ शिंदे बनले अजितदादा पवारांपेक्षा पॉवरफुल्ल!
मुंबई : खरा पंचनामा
महायुती सरकारमध्ये असलेला अंतर्गत वाद, विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे एकमेकांसोबत न पटणे आता काही प्रमाणात कमी झाले आहे. महायुतीत मागून येऊन सुद्धा फडणवीसांचा अजित पवारांवर जास्त विश्वास असल्याचे पाहायला मिळाले.
ज्यामुळे फडणवीसांनी वित्त विभागाची मोठी जबाबदारी अजितदादांकडे दिली. पण एकनाथ शिंदेंना गृहखाते हवे असताना सुद्धा फडणवीसांनी ती मागणी अमान्य केली. ज्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महायुतीत एकनाथ शिंदेंकडे मोठी जबाबदारी दिली आहे. फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयामुळे अजित पवारांचे महत्त्व कुठे ना कुठे कमी झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील अंतर्गत वाद टाळण्यासाठी आणि सुरळीत काम होण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. फडणवीसांनी घेतलेल्या निर्णयानुसार, यापुढे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्याकडे येणाऱ्या फाइल्स या उपमुख्यमंत्री शिंदेंकडे पाठवतील आणि त्यानंतर त्यांची तपासणी शिंदे करतील. शिंदेंनी फाइल पास केल्यानंतर पुढे ती फाइल मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवण्यात येईल. एकंदरितच काय तर अजित पवारांनी घेतलेल्या प्रत्येक निर्णयावर एकनाथ शिंदे नजर ठेवून असणार आहेत. फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे एकीकडे अजित पवारांचे वजन कमी झाले आहे, पण नाराज राहणाऱ्या शिंदेंचे महायुतीतील वजन वाढलेले आहे.
याआधी महायुतीत एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना फाइल प्रथम अजित पवारांकडे देण्यात यायची आणि नंतर ती देवेंद्र फडणवीस यांनी पाहिल्यानंतर ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचायची.
त्यामुळे आता सुद्धा पुन्हा तीच प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भूमिका बदलली आहे. कारण आता महायुतीच्या आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे आता उपमुख्यमंत्री झाले आहेत, तर उपमुख्यमंत्री असलेले फडणवीस हे आता मुख्यमंत्री बनले आहेत. पण अजित पवार ज्या पदी होत, त्याच उपमुख्यमंत्री पदावर आहेत. पण आता फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.