धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत?
निवडणूक प्रकरण जाणार न्यायालयात?
बीड : खरा पंचनामा
बीडमधून समोर आलेल्या घडामोडींमुळे माजी मंत्री धनंजय मुंडे यांची अडचण वाढण्याची चिन्हं दिसत आहेत. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता या प्रकरणाचा गुंता वाढण्याची शक्यता आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजेसाहेब देशमुख यांचं उच्च न्यायालयात जाण्याचं ठरलं आहे.
गुरुवारी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत रंजित कासले यांनी असा दावा केला की, ईव्हीएमपासून दूर राहण्यासाठी त्यांना 10 लाख रुपये देण्यात आले होते. एवढंच नव्हे तर त्यांनी आपलं बँक स्टेटमेंट सादर करत त्यातील साडेसात लाख रुपये परत केल्याचंही सांगितलं. उरलेली रक्कम अडीच लाख रुपये असल्याचे सांगत त्यांनी त्यातून सध्याचा खर्च चालवला जात असल्याचंही स्पष्ट केलं.
या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी नेते राजेसाहेब देशमुख यांनी धनंजय मुंडेंच्या आमदारकीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. 'जर एका कासलेला 10 लाख रुपये दिले असतील, तर इतर पोलीस अधिकाऱ्यांना किती दिले गेले असतील?' असा प्रश्न देशमुखांनी उपस्थित केला आहे.
कासले यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत केलेल्या आरोपांनुसार, निवडणुकीच्या दिवशी त्यांना मतदान प्रक्रियेपासून दूर ठेवण्यासाठी मोठी रक्कम देण्यात आली होती. त्यांनी असंही म्हटलं की, वाल्मिक कराड यांच्या एन्काऊंटरविषयीची चर्चा देखील बंद दरवाजामागे झाली होती.
या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांच्यावर नव्याने संशयाचे सावट निर्माण झाले आहे. विरोधक या संधीचा उपयोग करून त्यांच्यावर राजकीय आणि कायदेशीर दबाव वाढवण्याच्या तयारीत आहेत.
राजेसाहेब देशमुख यांनी स्पष्ट केलं की, 'धनंजय मुंडेंचं राजकीय कार्य कसं चालतं हे या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. ही बाब लोकशाहीच्या गंभीर धोक्याची आहे, म्हणूनच आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.