कुणाल कामराच्या शोमधील प्रेक्षकही अडचणीत
मुंबई पोलिसांनी थेट बजावले समन्स
मुंबई : खरा पंचनामा
कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या व्यंगात्मक गाणं गात टीका केली होती. त्यानंतर संतापलेल्या शिंदेंच्या शिवसैनिकांनी स्टुडिओची तोडफोड केली होती. त्यानंतर कुणाल कामराला मद्रास हायकोर्टाने अटकपूर्व जामीन देखील मंजूर केला.
दरम्यान, कुणाल कामराच्या घरी जाऊन मुंबई पोलीसांनी चौकशी केली आहे. दुस-या समन्सची मुदत संपत आली, तरी कुणाल कामरा खार पोलीस ठाण्यात चौकशीसाठी अद्याप हजर झालेला नाही.
तर दुसरीकडे कुणाल कामरामुळं त्याचे प्रेक्षकही अडचणीत आले आहेत. 'नया भारत' शोला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना मुंबई पोलिसांनी थेट समन्स बजावले आहे. या प्रकरणी भारतीय पोलिस सेवेतील माजी अधिकारी आणि आता वकील असलेले वाय.पी. सिंग यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना माहिती दिली आहे. मुंबई पोलिसांच्या या भुमिकेमुळं कामराच्या चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे.
मुंबई पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम १७९ अंतर्गत प्रेक्षकांना नोटिसा बजावल्या आहेत. या कलमांतर्गत पोलिसांना प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. पोलिसांना या शोमधील एक-दोन प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याचा अधिकार आहे. मात्र, या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे उपलब्ध असल्याने प्रेक्षकांना चौकशीसाठी बोलावण्याची आवश्यकता नसल्याचे माजी आयपीएस अधिकारी व वकील वाय. पी. सिंह यांनी म्हटले आहे.
कुणाल कामराने २ फेब्रुवारी रोजी मुंबईतील 'युनिकॉन्टिनेंटल' हॉटेलमधील 'द हॅबिटॅट' या स्टुडिओमध्ये 'नया भारत' हा स्टॅण्ड अप कॉमेडी शो आयोजित केला होता. याच शोमध्ये त्याने एकनाथ शिंदे यांच्यावरील विडंबनात्मक कविता सादर केली होती. या शोमध्ये जे प्रेक्षक उपस्थित होते त्यांना देखील पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. पोलीस या शोमधील प्रेक्षकांचे जबाब नोंदवणार असून काही प्रेक्षकांचे जबाब घेण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती मिळत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.