पोलिसांचे अमली पदार्थ कनेक्शन; उपनिरीक्षकाला ७० हजारांची लाच घेताना अटक
वसई : खरा पंचनामा
अमली पदार्थांवर कारवाई करण्याऐवजी त्या धंद्याला पोलीसच संरक्षण देत असल्याच्या घटना वाढत आहे. नया नगर मधील पोलीस अमली पदार्थांचा कारखाना चालविण्याचे प्रकरण समोर आले असताना याच पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलीस उपनिरीक्षकाला अटक करण्यात आली आहे.
अमली पदार्थ प्रकरणात पकडलेल्या आरोपीची जामिनावर सुटका करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर (५६) याला ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे
पोलीस उपनिरीक्षक रामनाथ तांदळकर हा नया नगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. एका आरोपीला एमडी हे अमली पदार्थ विक्री प्रकरणात अटक केली होती. त्याला जामीन मिळावा यासाठी अहवाल तयाल करण्यासाठी तांदळकर याने या आरोपीच्या भावाकडे ७० हजार रुपयांची लाच मागितली होती. याप्रकरणी आरोपीच्या भावाने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्री नया नगर पोलीस ठाण्यात सापळा वावून तांदळकर याला लाचेच्या रकमेतील ५० हजारांची रक्कम स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनकर नलावडे, योगेंद्र परदेशी, निल उगले, गणपते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
मार्च महिन्यात तुळींज पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस शिपाई विठ्ठल सगळे याला देखील अमली पदार्थ प्रकरणात लाच घेतान अटक करण्यात आली होती. अमली पदार्थ विक्रीवर कारवाई न करण्यासाठी दरमहा ५० हजारांचा हफ्ता सगळे याने मागितला होता. मात्र त्याची तक्रार केल्यानंतर ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला सापळा लावून अटक केली होती.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.