‘१०० दिवस कृती आराखडा’अंतर्गत जप्त दारू साठा नष्ट
महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचा उपक्रम
सांगली : खरा पंचनामा
‘१०० दिवस कृती आराखडा’अंतर्गत विविध कारवाईत जप्त करण्यात आलेला अवैध दारुसाठा नष्ट करण्यात आला. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याने विशेष मोहिम राबवून ही कारवाई केली. यात नऊ गुन्ह्यात जप्त केलेला ३८ हजार ४०० रुपये किमतीचा सुमारे ११० लिटर दारुसाठा नष्ट करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
शासकीय कार्यालयातील कामकाजाचा दर्जा वृध्दींगत व्हावा, प्रशासकीय कामकाज गतीमान व्हाने तसेच कामकाजात सुसुत्रता यावी यासाठी राज्य शासनाच्यावतीने ‘१०० दिवस कृती आराखडा’ उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनानेही अशी मोहिम सुरु केली आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे व राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने संयुक्तपणे कारवाई केलेली व न्यायालयाचा आदेश झालेला नऊ गुन्ह्यातील दारुसाठा यावेळी नष्ट करण्यात आला. यात दारुसाठा नष्ट करण्याबरोबरच इतरही उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
यावेळी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे, उत्पादन शुल्कचे निरीक्षक दीपक सुपे, पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र कलगुटकर, उदय कुलकर्णी, सर्जेराव पवार, सचिन कुंभार, अभिजीत पाटील, सुनील माने, अमोल तोडकर आदी उपस्थित होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.