Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘अवधान’ लघुपटाचे अनावरण

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ‘अवधान’ लघुपटाचे अनावरण

मुंबई : खरा पंचनामा

चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या हशू अडवाणी कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनद्वारे अध्ययन अक्षमता या  विषयावर निर्मित ‘अवधान’ या लघुपटाचे अनावरण आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सिंहगड शासकीय निवासस्थान येथे करण्यात आले.

‘अवधान’ या लघुपटाच्या माध्यमातून अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांना मिळणारे शिक्षण, तसेच समाजाची भूमिका यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. यामध्ये अध्ययन अक्षमतेची लक्षणे समजून घेवून मुलांच्या विकासावर लक्ष ठेवणे कसे गरजेचे आहे. याबाबतीत जनजागृती करून शिक्षक, समाज व पालक यांना अध्ययन अक्षमतेबाबत शंका कशी घ्यायची याविषयी मार्गदर्शन करणारी हा लघूपट असून  यासाठी जेष्ठ कलावंत नाना पाटेकर यांनी आवाज दिला आहे. याप्रसंगी विद्यापीठामध्ये दिव्यांग केंद्र निर्माण करण्यासंदर्भात सर्वसमावेशक चर्चा  करण्यात झाली.

यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, हशु अडवाणी विशेष शिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अस्मिता हुद्दार, सहयोगी प्राध्यापक डॉ. गायत्री शिरूर, डॉ. अमित मिसाळ, सहाय्यक प्राध्यापक निशा कुट्टी, पूनम मिश्रा, उत्तमचंद लेहरचंद ट्रस्ट फाउंडेशनचे कबीर भोगीलाल, निखिल पाटील उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.