"गुन्हा दाखल झाला म्हणजे दोषी होत नाही"
मुंबई : खरा पंचनामा
गुन्हा दाखल झाला म्हणजे दोषी असल्याचा ठपका ठेवता येत नाही. गुन्हा सिद्ध व्हावा लागतो, असे ठणकावत उच्च न्यायालयाने सोलापूर जिल्हाधिकारी यांना चांगलीच चपराक लगावली. या जिल्हाधिकारी यांनी येथील हॉटेल विजयराज व ऑर्केस्ट्रा बारमधील ऑर्केस्ट्राच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यास नकार दिला होता.
त्याविरोधात या ऑर्केस्ट्रा बारकडून याचिका दाखल झाली. न्या. अमित बोरकर यांच्या एकल पीठाने ही याचिका मंजूर करत ऑर्केस्ट्राच्या नूतनीकरणाचे आदेश दिले.
2014 पासून या बारमध्ये ऑर्केस्ट्रा सुरू आहे. याचा रीतसर परवाना आहे. या परवान्याचे नूतनीकरण केले जाते. त्यानुसार 23 ऑगस्ट 2022 रोजी परवाना नूतनीकरणासाठी संबंधित प्रशासनाकडे अर्ज करण्यात आला. संबंधित प्रशासनाने या अर्जावर पोलिसांचा अभिप्राय मागवला. बार व येथील कर्मचाऱयांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून याचा खटला प्रलंबित आहे, असा अहवाल पोलिसांनी दिला. त्या आधारावर प्रलंबित आहे, त्या आधारावर प्रशासनाने परवान्याचे नूतनीकरण नाकारले होते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.