कुणाल कामराच्या अटकेला स्थगिती, पण पोलिस करणार चौकशी
मुंबई : खरा पंचनामा
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एका कार्यक्रमात गाण्याच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'गद्दार' असे संबोधून जोरदार टीका केली होती.
या आरोपाखाली मुंबईत विविध पोलिस ठाण्यात कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, अटकेची भीती असलेला कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलास दिला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी कॉमेडियन कुणाल कामरा यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या एफआयआर प्रकरणी अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले, त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला. परंतु, कोर्टाने पोलिसांना या प्रकरणाचा तपास सुरू ठेवण्याची परवानगी देखील दिली आहे.
कुणाल कामराने आपल्याला अटकेपासून संरक्षण मिळावे म्हणून मुंबई उच्च न्यायलायात याचिका दाखल केली होती. कुणाल कामरा यांची याचिका मान्य करताना, खंडपीठाने आपल्या आदेशात स्पष्ट केले की, याचिकाकर्त्याला "एफआयआर अंतर्गत कार्यवाही प्रलंबित होईपर्यंत अटक केली जाणार नाही. तथापि, न्यायालयाने असेही म्हटले आहे की तपास कोणत्याही अडथळ्याशिवाय पुढे चालू ठेवता येईल.
न्यायालयाने आदेशात पुढे असेही सांगितले की, जर तपास यंत्रणेला कुणाल कामराचा जबाब नोंदवायचा असेल तर ते चेन्नईतील स्थानिक पोलिसांच्या मदतीने करू शकतात. कारण याचिकाकर्ता तिथेच राहतो, असेही न्यायालयाने स्पष्ट निर्देश दिलेत.
महत्त्वाची बाब म्हणजे, न्यायालयाने असेही निरीक्षण नोंदवले की, जर याचिका प्रलंबित असताना आरोपपत्र दाखल केले गेले, तर ट्रायल कोर्ट याचिकाकर्त्याविरुद्ध पुढे कारवाई करणार नाही. यामुळे याचिकेच्या सुनावणीदरम्यान कुणाल कामरा यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई केली जाणार नाही, अशी खात्री यातून दिसून येत आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.