पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीचा घेतला आढावा
सांगली : खरा पंचनामा
सांगली शहर व जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमिवर अतिरीक्त पोलीस आयुक्त रितू खोखर यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन क्राईम टास्क फोर्सच्या कामकाजाचाही आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पार पडलेल्या अमली पदार्थ टास्क फोर्सच्या आठव्या बैठकीत घेतला.
या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी, सांगली शहरच्या पोलीस उपाधीक्षक विमला एम., मिरजचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आदि उपस्थित होते.
गुन्हे नियंत्रणासाठी हा टास्क फोर्स प्रभावीपणे काम करत आहे. गुन्ह्यांची उकल वेळीच होत आहे. याबाबत समाधान व्यक्त करून चंद्रकांत पाटील म्हणाले, महानगरपालिका व पोलीस विभागाने छोट्या टॉवर पोलीस चौक्यांसाठी जागा निश्चित करुन देण्याच्या कार्यवाहीला गती द्यावी. जागा निश्चित करताना तिन्ही ऋतुंचा विचार करावा. आवश्क तेथे जिल्हा नियोजन समितीमधून निधी देण्यात येईल. तसेच, अशा घटनांतील आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी न्यायालयात व्यवस्थित कागदपत्रे सादर करावीत, असे त्यांनी यावेळी सूचित केले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.