Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेंटिसशिप ट्रेनिंग,पश्चिम विभाग, मुंबई यांच्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि बोर्ड ऑफ एप्रेंटिसशिप ट्रेनिंग,पश्चिम विभाग, मुंबई यांच्यात मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई : खरा पंचनामा

मुंबईतील शासकीय निवासस्थानी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या बोर्ड ऑफ एप्रेंटिसशिप ट्रेनिंग,पश्चिम विभाग, मुंबई यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. एप्रेंटिसशिप एंबेडेड डिग्री प्रोग्राम (एईडीपी) कोर्सेस नॅशनल एप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (एनएटीएस) मध्ये समाविष्ट करून या कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना एप्रेंटिसशिपच्या संधी उपलब्ध करण्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला असल्याची माहिती पाटील यांनी दिली. 

हा करार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यवृद्धी, प्रत्यक्ष औद्योगिक अनुभव आणि रोजगारक्षमतेच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरेल, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. यामुळे नॅशनल एप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम (NATS) अंतर्गत AEDP कोर्सेस समाविष्ट करण्यात आले असून, विद्यार्थ्यांना एप्रेंटिसशिपसाठी अधिक संधी आणि विद्यावेतन मिळणार आहे. प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना दर महिन्याला किमान ८ हजार रुपये विद्यावेतन दिले जाणार असून, त्यातील ५०टक्के रक्कम केंद्र सरकारकडून थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे.

यावेळी महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ संचालक डॉ प्रमोद नाईक, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य बोर्ड ऑफ एप्रेंटिसशिप ट्रेनिंग, पश्चिम विभागाचे संचालक पी. एन. जुमले,उपसंचालक एन. एन. वडोदे उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.