Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाराष्ट्र दिनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं जंबो आयोजनशरद पवारांना खास आमंत्रण

महाराष्ट्र दिनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं जंबो आयोजन
शरद पवारांना खास आमंत्रण

मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून यंदा महाराष्ट्र दिनासाठी तीन दिवसीय जंबो कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यंदा पक्षाकडून परळ परिसरात मोठ्या मैदान बुक करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात विरोधी पक्षातील नेत्यांना विशेष आमंत्रण देण्यात येणार आहे, यात शरद पवार उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

त्यामुळे एकीकडे राजकीय पटलावर लाडकी बहीण, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून एकमेकांसमोर उभा ठाकलेल्या महाविकास आघाडीतील नेत्यांना आमंत्रण देण्यात येणार असल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्यात.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून यंदा महाराष्ट्र दिनासाठी तीन दिवशीय जंबो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात जंबो कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमात महाराष्ट्र उभारणीच्या लढ्यात शहीद झालेल्या तसेच ६५ वर्षाच्या काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेल्या हयात व्यक्तीना किंवा त्यांच्या कुटुंबियांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सन्मानित करणार असल्याचं पक्षाकडून सांगण्यात आलं .

महाराष्ट्र दिनाच्या या कार्यक्रमाला शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण यांना कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित म्हणून बोलावण्यात येणार असल्याचीही माहिती आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय. पक्षाकडून यंदा राज्यातील विविध जिल्ह्यातून शोभा यात्रा काढण्यात येणार असून या यात्रा आपापल्या जिल्ह्यातील मंगल कलश माती सोबत घेऊन कराडला यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळावर जातील आणि त्यानंतर या सर्व शोभा यात्रा मुंबईला हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी येणार आहेत. यंदा पक्षाकडून परळ परिसरात मोठ मैदान बुक करण्यात आलं असून याठिकाणी ३ दिवस खाद्य महोत्सव, क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव राबविण्यात येणार आहे. पक्षाकडून सध्या स्थानिक, जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर बैठकांच सत्र सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.