Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नेमिनाथ सोसायटीतील रहिवाशांनाही पालिकेकडून नोटीसा? मंदिर विश्वस्तांच्या तक्रारीनंतर पालिकेची तपासणीजैन मंदिर प्रकरण

नेमिनाथ सोसायटीतील रहिवाशांनाही पालिकेकडून नोटीसा? मंदिर विश्वस्तांच्या तक्रारीनंतर पालिकेची तपासणी
जैन मंदिर प्रकरण

मुंबई : खरा पंचनामा

विलेपार्ले पूर्व येथील कांबळीवाडी परिसरातील जैन मंदिराचा काही भाग पाडल्याचे प्रकरण आता आणखी चिघळू लागले आहे. या प्रकरणी जैन मंदिराशी संबंधितांनी अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेतली आहे.

आयोगाच्या आदेशानुसार आता मंदिर असलेल्या संकुलातील अनधिकृत बांधकामाचीही पाहणी करण्यात येणार आहे. इमारत प्रस्ताव विभागाकडील आराखडे तपासून सोसायटीलाही नोटीसा धाडण्यात येणार आहे.

विलेपार्ले पूर्व येथील तेजपाल मार्गावरच्या दिगंबर जैन मंदिरावर मुंबई महापालिकेने केलेल्या पाडकाम कारवाईनंतर मोठा वाद उफाळून आला आहे. हे मंदिर वाचवण्यासाठी जैन समाजाने व मंदिर विश्वस्तांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. न्यायालयात लढाई हरल्यामुळे मंदिराच्या पाडकामानंतर मंदिराच्या संबंधितांनी अल्पसंख्यांक आयोगाकडे धाव घेतली आहे. आयोगाने मंगळवारी घेतलेल्या सुनावणीच्या वेळी मुंबई महापालिका प्रशासनावरच ताशेरे ओढले. महापालिकेने मंदिरावर कारवाई केली तशीच शेजारच्या हॉटेल आणि बारवरही करणार का ? असा जाब आयोगाने पालिकेला विचारला होता. हे मंदिर ज्या सोसायटीच्या आवारात आहे त्या नेमिनाथ सोसायटीमध्ये काही अनधिकृत बांधकाम आहे का याचीही आता चौकशी होणार आहे. आयोगाच्या आदेशानुसार मुंबई महापालिका प्रशासनाने आता इमारत प्रस्ताव विभागाकडून इमारतीचे मूळ आराखडे मागवले आहेत.

तसेच या सोसायटीच्या बाहेरच्या बाजूला रामकृष्ण हॉटेल असून या हॉटेल मालकाच्या काही सदनिका नेमिनाथ सोसायटीत आहेत. या हॉटेलमध्ये काही अनधिकृत बांधकाम केले आहे का याचीही तपासणी होणार आहे.

इमारत प्रस्ताव विभागाकडून आराखडे मिळाल्यानंतर सोसायटीत काही अनधिकृत बांधकाम झाले आहे का याची तपासणी केली जाईल. काही बदल केलेले असतील तर त्यानुसार नोटीसा बजावल्या जातील अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.