विधानपरिषद सभापती दौऱ्यात सुरक्षा आणि राजशिष्टाचारात कसूर
तीन पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची तर पाच कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाई!
बारामती : खरा पंचनामा
विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या बारामती दौऱ्यात सुरक्षाविषयक व राज्य शिष्टाचार विषयक कसूर केल्याप्रकरणी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते. या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांचा 15 आणि 16 एप्रिल रोजी बारामती दौरा झाला. या दौऱ्यात त्यांच्या सुरक्षा व राजशिष्टाचार विषयक कसूर झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले होते.
त्यानुसार त्याचा अहवाल आल्यानंतर बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक वैशाली पाटील यांच्यासह जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण बाळासाहेब मोरे आणि राखीव पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कोळी या तिघांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून, त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये एक वरिष्ठ पोलीस अधिकारी, तीन पोलीस अधिकारी आणि चार पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे पोलीस कर्मचाऱ्यांनाही दंडात्मक कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या परिविक्षाधीन फौजदार श्रीमती सुवर्णा गायकवाड, पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयातील हवालदार शामराव गायकवाड, पोलीस मुख्यालयातील शिपाई रोहित वायकर, जिल्हा विशेष शाखेच्या हवालदार श्रीमती सारिका बोरकर व सहाय्यक फौजदार वसंत वाघोले या पाच जणांवर कर्तव्यात कसूर केल्यावरून दंडात्मक कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे समजते.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.