जयकुमार गोरे यांच्या सुपुत्राच्या 'त्या' व्हिडिओमुळे पुन्हा चर्चेत
टीकेची राळ उठताच इन्स्टाग्राम पोस्ट केली डिलीट
मुंबई : खरा पंचनामा
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचे बाइकवर स्टंटबाजी करतानाचे काही व्हिडिओ समोर आलेले आहेत. आदित्यराज गोरे यांचे काही व्हिडिओ भैय्या पाटील यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केले असून त्यात आदित्यराज हा स्टंटबाजी करत असल्याचे दिसून येत आहे.
व्हिडिओ शेअर केल्यानंतर सुरू झालेल्या टीकेमुळे आता मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज गोरे याने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे स्टंटबाजीचे व्हिडिओ डिलीट केले आहेत.
दरम्यान या प्रकरणामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस हे या राज्याचे गृहमंत्री आहेत का? त्यांनी ठरवावं हे काय सुरू आहे? असा सवाल ही शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी विचारला आहे. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा-कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे. सदर बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही. कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का? सर्व सामान्य व्यक्तीने असे कृत्ये केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड, ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते. मग इथे वेगळा न्याय का? असा सवाल देखील भैय्या पाटील यांनी विचारला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.