आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला मदत करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यावर बदलीची कारवाई?
मुंबई : खरा पंचनामा
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटला पाठीशी घातल्याचा ठपका सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे यांच्यावर ठेवण्यात आला आहे, सोनावणे यांची सहार पोलीस ठाण्यातून सशस्त्र विभागात तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडून करण्यात येत असून गुन्हे शाखेच्या तपासात या रॅकेटमधील आरोपींविरुद्ध कारवाई करताना सहार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक धनंजय सोनावणे यांनी कथित निष्काळजीपणा दाखविल्याचे समोर आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी करणाऱ्या या टोळीने शेकडो भारतीयांना "डंकी" मार्गाने बेकायदेशीरपणे अमेरिकेसारख्या देशांमध्ये पाठवण्यात आल्याचे उघडकीस आल्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेने या टोळीच्या अनेक सदस्यांना अटक केली आहे. बनावट पासपोर्ट आणि व्हिसाचा वापर करून अमेरिका, कॅनडा, तुर्की, नेदरलँड्स आणि पोलंडसारख्या देशांमध्ये किमान ८० व्यक्तींना बेकायदेशीरपणे पाठवल्याचे तपासात उघडकीस आले होते.
गुन्हे शाखेच्या तपासादरम्यान, धक्कादायक माहिती समोर आली, सहार पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे यांनी आरोपींपैकी एकाच्या विरुद्ध पूर्वीच्या तस्करीच्या प्रकरणाची चौकशी केली नव्हती, धनंजय सोनावणे यांनी या आरोपीला सहकार्य केले होते अशी माहिती तपासात समोर आल्यानंतर सहार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय सोनावणे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.