Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नगराध्यक्षांना हटविण्याचा 'तो' अध्यादेश; शिंदे अन् पवारांच्या मतदारसंघात आज पहिला निर्णय होणार!

नगराध्यक्षांना हटविण्याचा 'तो' अध्यादेश; शिंदे अन् पवारांच्या मतदारसंघात आज पहिला निर्णय होणार!

कर्जत : खरा पंचनामा

महायुती सरकारनं नगराध्यक्षांना हटविण्याचा अधिकार नगरसेवकांना दिल्याचा नवीन अध्यादेशाला राज्यात पहिल्यांदा समोर जाणार आहे ती, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायत !

कट्टर विरोधक भाजपचे आमदार तथा विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या विधानसभा मतदारसंघामध्ये यानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून पुन्हा राजकीय संघर्ष उफळला आहे.

आमदार पवार गटाचे नगराध्यक्षांविरोधात दाखल अविश्वास ठरावावर, आज सोमवारी विशेष सभा होणार आहे. या विशेष सभाच्या अदल्यारात्री कर्जतमध्ये अनेक वेगवान राजकीय घडमोडी घडल्या. त्यामुळे आज होणाऱ्या विशेष सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

आमदार रोहित पवारांनी विद्यमान नगराध्यक्ष उषा राऊत यांच्यासह राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी भेट घेतली. तत्पूर्वी स्थानिक नेते तथा नगरसेवक नामदेव राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला. प्रा. शिंदे यांचं कर्जत नगरपंचायतीबाबत विध्वंसक राजकारण केल्याचा घणाघात नामदेव राऊत यांनी केला. नगराध्यक्षा उषा राऊत, नगरसेविका प्रतिभा भैलुमे, राहुल नेटके, ज्ञानदेव लष्कर, नामदेव थोरात उपस्थित होते.

कर्जत नगरपंचायतीचा नगराध्यक्ष बदलण्यासाठी अन् फक्त आमदार रोहित पवार यांना राजकीय शह देण्यासाठी राज्याच्या सभापतीला कायदा बदलून अध्यादेश काढावा लागला, यातच आमचा मोठा विजय आहे. ओबीसी नेत्यांचं प्रस्थ कुठतरी खुपतं, त्यातूनच हा राजकीय डाव खेळला, असा टोला राऊतांनी सभापती प्रा. शिंदेंना लगावला.

विकास कामांचे राजकारण खेळा, असे म्हणत उपनगराध्यक्षांनी यासाठी समोरा समोर यावं, असं खुलं आव्हान घुले बंधूंना राऊतांनी दिलं. राजकारण होत असते, पण ज्यांच्या पडत्या काळात त्यांच्या विजयासाठी हातभार लावला, त्या नगरसेवकांनी साथ सोडली याचे दुःख निश्चित आहे, अशी खंत देखील राऊत यांनी व्यक्त केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.