सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार
अलिगड : खरा पंचनामा
उत्तर प्रदेशमधील प्रेम प्रकरणांच्या बातम्या काही थांबत नाहीत. काही दिवसापूर्वी एका सासूने होणाऱ्या जावयासोबत धूम ठोकल्याचे समोर आले होते. आता यासारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. आता अलिगडच्या रोरावार भागात, प्रेम प्रकरणाची आणखी एक बातमी समोर आली आहे. येथे एक २२ वर्षीय विवाहित महिला १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलासोबत पळून गेली आहे. दोघांचेही कुटुंब एकमेकांवर आरोप करत आहेत. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिस दोघांचाही शोध घेत आहेत.
रोरावार परिसरातील आसिफ बाग येथील रहिवासी असलेल्या या महिलेचे लग्न सुमारे सव्वा वर्षांपूर्वी झाले होते. ती तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती. या काळात, तीची शेजारच्या एका १५ वर्षांच्या मुलासोबत जवळीक झाली. एका विवाहित महिलेची किशोरवयीन मुलाशी बोलण्याची पद्धत कुटुंबातील सदस्यांना आणि इतर लोकांना आवडली नाही. पण, रविवारी दोघेही अचानक एकत्र गायब झाले.
आधी विवाहितेच्या कुटुंबातील सदस्यांनी मुलाच्या घरी जाऊन त्याच्यावर मुलीचे अपहरण केल्याचा आरोप केला. दुसरीकडे, एक दिवस उलटूनही कोणतीही माहिती न मिळाल्याने सोमवारी मुलाच्या बाजूचे लोक पोलिस ठाण्यामध्ये पोहोचले. मुलाच्या आईने तक्रार दाखल केली. यात त्यांनी एका विवाहित महिलेने त्याच्या मुलाला फसवल्याचा आरोप केला. मुलीचे कुटुंब विविध आरोप करत आहे आणि धमक्या देत आहे. तर त्यांचे कुटुंबीय स्वतः दोघांचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांना बोलावून त्यांची चौकशी केली. पण त्यांनी तक्रार दाखल करण्यास नकार दिला. पोलिसांनी मुलीला शोधून काढण्याची विनंती केली. मात्र, दोघांचेही कुटुंबीय यापेक्षा जास्त काही सांगण्याचे टाळत आहेत. पोलिसांनी सांगितले की, महिलेवर एका अल्पवयीन मुलाला पळवून नेल्याचा आरोप आहे. तपास सुरू आहे. महिला आणि अल्पवयीन मुलाचा शोध घेण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.