धनंजय मुंडेंनीच पंकजा मुंडेंची सुपारी दिली!
मुंबई : खरा पंचनामा
धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यात आता सख्य आहे. पण काही वर्षांपूर्वी पंकजा मुंडेंविरोधातले पुरावे घेऊन धनंजय मुंडे आपले उंबरठे झिजवत होते असा सनसनाटी आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानि यांनी केला आहे. पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट यांनी पुराव्याच्या फाईल्स गोळा केल्याचा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे.
पंकजा मुंडेंविरोधात राजेंद्र घनवट आणि धनंजय मुंडेंनी आणलेल्या फाईल्स आजही घरात पडून असल्याचा दावा अंजली दमानियांनी केलाय. आपण असली कामं करत नसल्याचं त्यावेळी निक्षून सांगितल्याचा दावाही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे आणि घनवट यांच्यात प्रचंड सख्य असल्याचं दमानियांनी सांगितलंय. जसं वाल्मिक कराड म्हणजं धनंजय मुंडे तसं राजेंद्र घनवट म्हणजे धनंजय मुंडे असंही समीकरण असल्याचं पंकजांनी सांगितलंय.
धनंजय मुंडेंनी त्यावेळी बहीण पंकजांविरोधात सुपारी देऊ केली होती असंही अंजली दमानिया म्हणाल्यात. अंजली दमानियांच्या घरी आपण कधीच गेलो नसल्याचा दावा पोपट घनवट यांनी केलाय. अंजली दमानियांनी केलेले सगळे आरोप त्यांनी फेटाळलेत.
धनंजय मुंडेंवर दमानियांनी गंभीर आरोप केलेत. या आरोपांमुळं धनंजय आणि पंकजा या भाऊबहिणींच्या नात्यात पुन्हा कटूता येते की काय अशी चर्चा आता बीडमध्ये सुरु झालीये.
बीडमधील शेतक-यांची फसवणूक करून जमिनी लाटल्याचा गंभीर आरोप अंजली दमानिया यांनी केलाय. राजेंद्र घनवट आणि पोपट घनवट यांनी शेतक-यांची फसवणूक करून त्यांच्या जमिनी लाटल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. खोटे गुन्हे दाखल करून आणि धमकी देऊन कोट्यवधींची जमीन लाखो रुपयात घेल्याचं दमानिया म्हणाल्या आहेत.. तसेच धनंजय मुंडे, वाल्मिक कराट आणि घनवट अशी टोळी बीडमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलंय.. धनंजय मुंडेंनी दबाव टाकल्यामुळे 9 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोपही दमानियांनी केलाय. पीडित शेतक-यांसोबत दमानियांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केलेत.. यावेळी पीडित महिला शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेत.. आमच्या जमिनी परत देण्याची मागणी पीडित महिला शेतक-यांनी केलीय.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.