जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी करणाऱ्या त्या व्यक्तीच्या घरावर ईडीचा छापा
बंगळूरू : खरा पंचनामा
बंगळुरूमधील एका व्यक्तीनं आपण जगातील सर्वात महागडे कुत्रे विकत घेतल्याचा दावा केला होता. आपण खरेदी केलेल्या कुत्र्याची किंमत 50 कोटी रुपये असल्याचंही त्याने म्हटलं होतं. सतीश असं या व्यक्तीचं नाव आहे.
त्याने केलेल्या दाव्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. तो इतका चर्चेत आला की, त्याच्या घरावर आता ईडीनं छापा टाकला आहे. या व्यक्तीच्या चौकशीमधून ईडीला धक्कादायक माहिती मिळाली आहे.
परकीय चलन व्यवस्थापन कायद्यांतर्गत ईडीनं या व्यक्तीच्या घरावर छापा टाकला. सतीशने आपण जगातील सर्वात महागडा कुत्रा खरेदी केला असून, त्याची किंमत तब्बल 50 कोटी रुपये असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आज अंमलबजावणी संचालनालयानं त्याच्या घरावर छापा टाकला. जर या व्यक्तीच्या दाव्यानुसार त्याने पन्नास कोटी रुपयांचा कुत्रा खरेदी केला असेल तर त्याने ते पैसे कसे दिले, त्याच्याकडे एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न ईडीसमोर आहे, त्यामुळे त्याच्या घरावर छापेमारी करण्यात आली.
मात्र ईडीनं जेव्हा त्याचं बँक खातं तपासलं तेव्हा ईडीच्या अधिकाऱ्यांना देखील मोठा धक्का बसला, कारण पन्नास कोटींचा कोणताही व्यवहार त्याच्या खात्यामधून झालाच नव्हता. जर त्याने आपल्या बँक खात्यातून हा व्यवहार केला नाही तर मग त्याने यासाठी हवाला मार्गाचा उपयोग केला असावा असा ईडीला संशय आहे. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी समोरासमोर बसून सतीशची चौकशी केली.
या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीशने जो कुत्रा खरेदी केला आहे, तो कोणत्याही विदेशी प्रजातीचा कुत्रा नसून, देशी कुत्रा असल्याचं ईडीच्या प्राथमिक चौकशीमधून समोर आलं आहे. या प्रकरणात आणखी तपास सुरू असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.
एका वृत्तपत्राला दिलेला मुलाखतीमध्ये सतीश याने असा दावा केला होता की, आपण जो कुत्रा खरेदी केला आहे, त्याची किंमत पन्नास कोटी रुपये असून, हा जगातील सर्वात महागडा कुत्रा आहे. हा एक अत्यंत दुर्लभ प्राजातीचा कुत्रा आहे. हा कुत्रा लांडग्यासारखा दिसतो, अमेरिकेमधून हा कुत्रा आपण खरेदी केल्याचं सतीशने म्हटलं होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.