पहलगाम हल्ल्यामागे कुणाचा हात?
पाकिस्तानच्या जवानानेच केला पर्दाफाश
दिल्ली : खरा पंचनामा
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २८ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवून टाकले. या हल्ल्याचा कट कोणी रचला होता? दहशतवादी कोणी पाठवले होते? दहशतवाद्यांना कोणी मदत केली? पैसे कोणी दिले? शस्त्रे कोणी दिली? असे अनेक प्रश्न सर्व भारतीयांना पडले आहेत. आता या कटावरील पडदा पाकिस्तानी लष्कारात असलेल्या एका सैनिकानेच उचलला आहे.
पाकिस्तानी लष्कराचे माजी सैनिक आदिल राजा यांनी एक खळबळजनक खुलासा केला असून त्यामुळे आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे. त्यांनी दावा केला की, 'पहलगाम हल्ला पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्या आदेशावरून झाला.' त्यांच्या या दाव्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तानचा पर्दाफाश झाला आहे.
आदिल राजा यांनी गुप्तचर सूत्रांचा हवाला देत हा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. ते म्हणाले की, 'पहलगाम हल्ला जनरल असीम मुनीर यांच्या आदेशावरून झाला. मुनीरने जाणूनबुजून हा हल्ला केला जेणेकरून त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेले खटले दाबले जातील. एका खुर्चीसाठी पहलगाममध्ये निष्पापांचे रक्त सांडले गेले.' आदिल राजा यांच्या म्हणण्यानुसार, 'मुनीरने प्रथम परदेशी पाकिस्तानींना बोलावून प्रक्षोभक विधाने केली आणि नंतर हा हल्ला केला.'
आदिल राजा यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, 'मी ही पोस्ट लिहित असताना लोक मला भारतीयांचा एजंट म्हणतील, पण सत्य हे आहे की पहलगाम हल्ला मुनीरच्या आदेशावरून झाला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे ऑफ द रेकॉर्ड सांगितले आहे.' आदिल राजा यांच्या या दाव्यानंतर पाकिस्तानचे संरक्षण तज्ज्ञ यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली. निवृत्त मेजर जनरल हैदर खान म्हणाले की, 'जर हे खरे असेल तर ते पाकिस्तानसाठी लज्जास्पद आहे. असीम मनीरच्या या कृतीमळे केवळ पाकिस्तानची प्रतिमा मलिन होत नाही तर प्रादेशिक शांतताही धोक्यात येत आहे.'
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.