Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने रविवारी दिगंबर जैन उद्योजक मेळाव्याचे आयोजन

दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने रविवारी दिगंबर जैन उद्योजक मेळाव्याचे आयोजन

सांगली : खरा पंचनामा

समाजातील नवउद्योजकांना प्रोत्साहन, प्रसिद्ध अनुभवी उद्योजकांचे मार्गदर्शन आणि उद्योगधंद्यामधील नवनविन संधी याविषयी रविवार, दि. ६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वा. ऐश्वर्या मल्टिपर्पज हॉल, इनामधामणी (सांगली) येथे दक्षिण भारत जैन सभेच्यावतीने दिगंबर जैन उद्योग मेळावा आयोजित केला आहे.

दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या मेळाव्यासाठी यड्रावकर उद्योगसमूहाचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, प्राईड ग्रुप पुणे येथील अरविंद जैन, आवाडे उद्योगसमूहाचे आमदार राहूल आवाडे, अरिहंत उद्योग समूहाचे अभिनंदन पाटील, चंदुकाका सराफ अँड सन्स्चे अतुलभाई शहा सराफ, घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे सीएमडी किरण पाटील, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष रविंद्र माणगावे, स्पार्कलाईन इक्विपमेंट प्रा.लि. चे चेअरमन शीतल दोशी, बेळगाव यथील जिनबकुल फोर्जचे उद्योगपती गोपाल जिनगौडा, गणेश बेकरीचे आण्णासाहेब चकोते आणि सर्वो कंट्रोलर्सचे चेअरमन दीपक धडौती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा संपन्न होतो आहे.

या मेळाव्यामध्ये 'बिझनेस अॅप'चे उ‌द्घाटन होईल. या अॅपद्वारे एकंदरीत सामाजिक समृद्धीच्या दृष्टीकोणातून सर्व व्यावसायिक, सेवा देणाऱ्या संस्था, उद्योजक यांना एकाच प्लॅटफॉर्मवर आणून या माध्यमातून समाजातील युवकांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.

या निमित्ताने 'सभासद ऑनलाईन रजिस्ट्रेशन' चा शुभारंभ करण्यात येणार आहे. यामुळे जगभरातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या दिगंबर जैन युवक किंवा युवतींना दक्षिण भारत जैन सभेचे सभासद होता येणार आहे. या मेळाव्याच्या निमित्ताने दक्षिण भारत जैन सभेचे अद्ययावत परिपूर्ण अशा 'वेबसाईट'चे उद्घाटनही संपन्न होतो आहे.

या मेळाव्याच्या उपस्थितीसाठी दिड हजारहून अधिक उद्योग-व्यावसायिकांनी रजिस्ट्रेशन केले असून सांगली, पुणे, मुंबई, बेळगाव आदि ठिकाणाहून दोन हजारहून अधिक मान्यवर उपस्थित राहतील असा संयोजकांचा अंदाज असून भारतभर याचे कार्यक्षेत्र विस्तार करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वी होण्यासाठी दक्षिण भारत जैन सभेच्या जैन चेंबर ऑफ कॉमर्सचे चेअरमन सचिन तात्या पाटील, व्हा. चेअरमन सागर वडगावे व सागर आडगाणे सेक्रेटरी सुदर्शन हेरले, तरूण उद्योजक शितल थोटे, अमोल पाटील, रमेश आरवाडे, भरत माणगावे, सागर घोंगडे, भाऊसोो नाईक, दीपक पाटील आदि मान्यवर मेळावा यशस्वी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेत आहेत.

पत्रकार परिषदेसाठी द.भा. जैन सभेचे अध्यक्ष, भालचंद्र पाटील, चेअरमन रावसाहेब जि. पाटील, व्हा. चेअरमन दत्ता डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील, खजिनदार संजय शेटे, सहखजिनदार अरविंद मजलेकर यांच्यासह उद्योजक कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.