बांदीपोरात लष्कर-ए-तैय्यबाच्या चार दहशतवाद्यांना पकडले
उधमपूरमध्ये चकमक
जम्मू काश्मीर : खरा पंचनामा
जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट आहेत. काश्मीरात कडेकोट बंदोबस्त आहे. या हल्लेखोर दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी सैन्याकडून सर्च ऑपरेशन राबवण्यात येत आहे.
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यातील तीन दहशतवादी पाकिस्तानी आहेत आणि दोघे जण काश्मीरी आहेत. दरम्यान, शोध मोहिमेदरम्यान बांदीपोरा येथे लष्कर ए तैयबाच्या चार दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, उधमपूरमध्ये झालेल्या चकमकीत सैन्यातील एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे.
गुरुवारी पूंछ जिल्ह्यातील लसाना जंगलात भारतीय सैन्याने जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू केले. या मोहिमेत जवान जंगल आणि दरी खोऱ्यात जाऊन दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. इतकेच नाही पहलगाममधील हल्लेखोरांना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचा निश्चय सरकारने केला आहे. जो कुणी या दहशतवाद्यांची माहिती देईल त्याला रोख बक्षीसाची घोषणा करण्यात आली आहे.
या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारतीय सैन्याने ठिकठिकाणी शोध मोहिम सुरू केली आहे. याच मोहिमेत उत्तर बांदीपोरा जिल्ह्यातून चार दहशतवाद्यांना जिवंत पकडण्यात आले आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणातील शस्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यानंतरही या भागात सर्च ऑपरेशन सुरुच राहणार आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.