Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटलं'

'आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या, अजान म्हटलं'

पुणे : खरा पंचनामा

पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला आहे. यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामध्ये पुण्यातील लहानपणापासूनचे जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटेंच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी शरद पवार त्यांच्या घरी दाखल झाले. जगदाळे कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर शरद पवार कौस्तुभ गणबोटे यांच्या घरी पोहचले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी तेथे घडलेली सर्व हकीकत शरद पवारांना सांगितली.

कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नीने शरद पवार यांना तेथील अनुभव सांगितला. "आम्ही तिथं असलेल्या सगळ्या महिलांनी मोठ्या मोठ्याने अजान म्हटलं. पण, त्यांनी आमच्या माणसांना मारून टाकलं. तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. संतोष जगदाळे यांचा परिवार आणि आम्ही सोबत होतो. त्यांचा मित्र बाजूला होता. त्याला बोलावून घेतलं आणि म्हणाला 'अजान पढता है क्या, पढता है क्या कुछ?' त्याच बोलण ऐकून आम्ही आमच्या टिकल्या काढून फेकल्या आणि आम्ही सगळे अल्लाह हू अकबर म्हणायला लागलो. मारणारे चार जण होते."

"एक मुस्लीम घोडेवाला आम्हाला वाचवत होता, दहशतवाद्यांनी त्यालाही कपडे काढून त्याला गोळ्या मारल्या. आम्हाला बऱ्याच लोकांनी मदत केली, सैन्य दलाची देखील मदत झाली. पण ती उशिरा झाली. तोपर्यंत हे गेले होते. माझ्या समोर गोळ्या घातल्या, तुम्ही अजान वाचा म्हणून सांगत होते. आम्ही तिथं घोड्यावर बसून गेलो तरी आम्हाला भीती वाटत होती. आम्ही पळत सुटलो तिथून तर चिखलात गुडघ्याइतके पाय खाली रुतत होते. आमच्या घोड्यावाले मुस्लिम होते पण ते खूप चांगले होते. ते आम्हाला हल्ला झाल्यानंतर आम्हाला घ्यायला आले," असंही त्यांनी सांगितलं.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 पर्यटकांचा मृत्यू झाला. यात डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे. तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. डोंबिवलीचे अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला. पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पनवेलमधील दिलीप देसले यांचाही हल्ल्यात मृत्यू झाला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.