Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्यांना उद्योग नाहीत, उगाच वाद घालत बसतात'

'त्यांना उद्योग नाहीत, उगाच वाद घालत बसतात'

पुणे : खरा पंचनामा

राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून 'राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा 2024' तयार करण्यात आला आहे. या आराखड्यानुसार आता तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. त्यानंतर आता राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविरोधात मनसे चांगलीच आक्रमक झाली असून, मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही ट्विट करत ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही, असा इशारा दिला आहे.

या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. सध्या समोरच्या राजकीय पक्षांना मुद्दा राहिलेला नाही. त्यामुळे ते उगाच वाद घालत आहेत, असं अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी शुक्रवारी पिंपरी-चिंचवडमध्ये प्रसारमाध्यमांशी सवांद साधला. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, सध्या कुणाला उद्योग नाही. मराठी आपली मातृभाषा आहेच. त्याबद्दल कोणाचं दुमत नाही. प्रत्येक राज्याला आपली मातृभाषा असते त्याविषयी आपुलकी, प्रेम आणि जिव्हाळा असतो. तो टिकला पाहिजे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा पंतप्रधान मोदी साहेबांनी दिला. खूप वर्षे दिल्लीत हे प्रकरण पडून होतं, ते कोणी करण्याचं धाडस दाखवलं नाही. ते एनडीए सरकारने, मोदी साहेबांनी दाखवल, असं अजित पवार म्हणाले.

पुढे बोलताना म्हणाले, आता मराठी भाषा भवन मरीन ड्राईव्हला चांगल्याप्रकारची वास्तू तयार करण्याचे ठरवले आहे. सगळा आराखडा तयार आहे, निधीची कुठलीही कमतरता नाही. हे करत असताना जगात मॅक्झिमम भाषा इंग्रजी ही चालते. त्यामुळे तुमच्या आमच्या घरात नवीन पिढीला महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलंच पाहिजे. त्याचबरोबर भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये हिंदी पण चालतं, असंही अजित पवार यांनी म्हटले आहे.

काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा आहे, पण त्यावर वाद आहे, मला त्या वादात शिरायचं नाहीय. बाकीच्यांना सध्या कुणाला उद्योग नाहीत ना, काम नाही ना, ते असले वाद काही ना काही घालतात. त्याच्यात ते वेळ घालवतात. इंग्रजी ही जगात सर्वत्र चालते, त्यामुळे तीदेखील आली पाहिजे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.