Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला' उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची डॉ. कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली

'विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला' 
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची डॉ. कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली

मुंबई : खरा पंचनामा

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांचे आज, २५ एप्रिल रोजी, बेंगळुरूत निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचे पार्थिव शरीर रमन रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये २७ एप्रिलला दर्शनासाठी ठेवले  जाणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कस्तुरीरंगन यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला, अशी प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली. 

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, इस्रोचे माजी अध्यक्ष, देशाच्या विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व, पद्मश्री, पद्म भूषण, पद्मविभूषण के कस्तुरीरंगन यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. नऊ वर्षे इस्रोचे नेतृत्व करताना त्यांनी भारताच्या अंतराळ संशोधनाला आकार आणि दिशा दिली. त्यांच्या नेतृत्वात इस्रोने अनेक अंतराळ मोहिमा यशस्वी केल्या. देशाच्या अंतराळ कार्यक्रमाला त्यांनी नवी उंची दिली. अनेक तरुण संशोधकांना त्यांनी मार्गदर्शन केले. नव्या शैक्षणिक धोरणाचा मसुदा तयार करण्यात त्यांचे अमूल्य योगदान होते. कस्तुरीरंगन यांच्या रूपाने विज्ञानाच्या आणि ज्ञानाच्या क्षेत्रात तेजाने तळपणारा भारतीय तारा अंतर्धान पावला. त्यांचे दूरदर्शी नेतृत्व आणि देशासाठी दिलेले निःस्वार्थ योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर मृतात्म्यास सद्गती देवो, अशी प्रार्थना पाटील यांनी केली. 

डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी 9 वर्ष इस्त्रो चं नेतृत्त्व केले आहे.डॉ. कस्तुरीरंगन यांनी ऑगस्ट 2003 मध्ये निवृत्त होईपर्यंत अंतराळ आयोगाचे अध्यक्ष आणि अंतराळ विभागाचे सचिव म्हणूनही काम करत होते. जुलै 2023 मध्ये, श्रीलंकेला भेट देत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना उपचारांसाठी विमानाने बेंगळुरूला नेण्यात आले. भारत सरकारने त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवलेले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.