पोलीस ठाण्यात वरिष्ठांशी अरेरावी करणारा हवालदार निलंबित
नाशिक : खरा पंचनामा
गणवेशाची विचारणा केल्याच्या रागातून हवालदाराने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अरेरावी केल्याचे उघड झाले. गंगापूर पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला. याची गंभीर दखल घेत बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवत हवालदारास निलंबित करण्यात आले आहे.
विजय जाधव असे निलंबित हवालदाराचे नाव आहे. गंगापूर पोलीस ठाण्यात शुक्रवारी सकाळी ही घटना घडली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमलदारांना सूचना देत होते. तेव्हा हवालदार जाधव यांना बोलाविण्यात आले.
जाधव हे खासगी गणवेशात आल्याने याबद्दल विचारणा केल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना एकेरी बोलून राजीनामा देण्याची भाषा वापरली. काही वेळाने गणवेश परिधान करून ते परत आले. विना परवानगी वरिष्ठांच्या कक्षात शिरले. उपस्थित तक्रारदार आणि अभ्यांगतांसमोर वरिष्ठांच्या कक्षात अंगावर धावून जात नोकरी घालविण्याची धमकी दिली. शिस्तबध्द पोलीस खात्यात बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांचे निलंबन करण्यात आले. याबाबतचे आदेश मुख्यालय उपायुक्त चंद्रकात खांडवी यांनी काढले. निलंबन काळात हवालदार जाधव यांना पोलीस मुख्यालयात दिवसातून दोन वेळा हजेरी लावण्याचे आदेशात नमूद केले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.