पोलिस अधिकारी काझीच्या दोषमुक्ततेस कोर्टाचा नकार, गुन्हेगारी कटाचा आरोप
अँटालिया स्फोटके प्रकरण
मुंबई : खरा पंचनामा
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटालिया या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली कार उभी केल्याच्या प्रकरणात आरोपी असलेला पोलिस अधिकारी रियाजुद्दीन काझी याला खटल्यातून दोषमुक्त करण्यात विशेष न्यायालयाने नकार दिला.
काझीने त्याचा साथीदार आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझेच्या सांगण्यावरून पुरावे नष्ट करण्याच्या प्रक्रियेला परवानगी दिली होती, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.
या प्रकरणात तपास अधिकारी सचिन वाझे असल्याने त्याच्या आदेशाचे आपण पालन केले, असे म्हणत काझी याने आपल्याला या खटल्यातून दोषमुक्त करावे, अशी विनंती न्यायालयाकडे केली.
'पुरावे गायब करून आरोपीला पाठीशी घालण्याकरिता काझी याने सचिन वाझेच्या सांगण्यावरून डीव्हीडी, सीपीयू इत्यादी गोळा केले. काझी याने आरोपीला यूएपीए कायद्याअंतर्गत येणारा गुन्हा करण्यासाठी मदत केली.
काझीने पुरावे नष्ट करण्यासाठी सर्व प्रक्रिया पार पाडल्या,' असे निरीक्षण विशेष न्यायालयाचे न्या. ए. एम. पाटील यांनी काझीचा दोषमुक्तततेचा अर्ज फेटाळताना नोंदविले.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.