प्राध्यापकाची आत्महत्या नसून हत्या; किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप
हाती बॅनर घेऊन वृद्धाचं मंत्रालयासमोर आंदोलन
मुंबई : खरा पंचनामा
अलिबागमध्ये आत्महत्या केलेल्या प्राध्यापक अविनाश ओक यांना न्याय मिळावा यासाठी आज मंत्रालयाच्या बाहेर एका सामाजिक कार्यकर्त्याने आंदोलन केले. अविनाश ओक हे किरीट सोमय्या यांचे नातेवाईक असून त्यांनी 5 मार्चला आत्महत्या केली.
त्यांच्या आत्महत्येला किरीट सोमय्या जबाबदार आहेत. त्यामुळे, किरीट सोमया यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी करत आशिष करंदीकर यांनी मंत्रालयाच्या बाहेर हाती फलक घेऊन आंदोलन केलं. आपण, या संदर्भात वारंवार मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली. मात्र, किरीट सोमय्या भाजपचा नेता असल्यामुळे मुख्यमंत्री कारवाई करत नसल्याचा आरोप देखील करंदीकर यांनी केलाय.
आपण किरीट सोमय्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत, खून, खंडणी, अपहरणाचे सगळे गुन्हे आहेत. पण, पोलिस सिव्हील मॅटर म्हणून हे गुन्हे दाखल करत आहेत. कारण, पोलिसांवर किरीट सोमय्यांचा दबाव असून त्यांच्यामुळे पोलीस कुठलीही कारवाई करत नाहीत. हे दुसरं बीड प्रकरण आहे, त्यामुळे, 6 महिन्यानंतर आता मी रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहे, असे आशिष करंदीकर यांनी म्हटलं. दरम्यान, मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन करणाऱ्या अशिष करंदीकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मला संविधानाकडून मिळालेला बोलण्याचा अधिकार देखील हिरावून घेतला जातोय, असे यावेळी करंदीकर यांनी म्हटलं.
अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेजचे निवृत्त प्राध्यापक आणि जनशिक्षण संस्था रायगडचे माजी अध्यक्ष अविनाश मनोहर ओक यांनी आत्महत्या केली. पेण रेल्वे स्टेशन येथे धावत्या रेल्वे समोर उडी घेऊन त्यांनी जीवन संपवलं. अविनाश ओक यांच्या आत्महत्येमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे तात्काळ पेणमध्ये दाखल झाले होते. किरीट सोमय्या हे प्राध्यापक अविनाश ओक यांचे चुलत मेहुणे असल्याची माहिती आहे.
अविनाश ओक हे मूळचे रायगड मधील माणगाव येथे राहणारे असून त्यांचे वडील प्रसिद्ध वकील होते. प्राध्यापक अविनाश ओक अलिबाग येथे कामानिमित्ताने स्थायिक झाले होते.
अलिबाग येथील जे.एस.एम कॉलेज येथे राज्यशास्त्र या विषयाचे ते प्राध्यापक होते. याच दरम्यान त्यांनी रायगडच्या जनशिक्षण संस्थेचे अध्यक्ष पद भूषविले होते. त्यांच्या पत्नी अलिबाग येथील कमळ नागरी संस्थेच्या संचालिक आहेत. प्राध्यापक अविनाश ओक यांचा सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात मोठे कार्य होतं.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.