अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा
पुणे : खरा पंचनामा
पुण्यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समर्थ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंतनू कुकडे असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याचे नाव आहे. शंतनू कुकडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका सेलमध्ये अध्यक्ष पदावर काम करत होते. त्यांच्याविरोधात समर्थ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
पुण्यात राष्ट्रवादीचा पदाधिकाऱ्याकडून महिलेचे लैगिंक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शंतनु कुकडे असं त्या कार्कर्त्याचे नाव आहे, हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. समर्थ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये त्याच्या घरात डान्सबार चालू असल्याचाही आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.
शंतनु कुकडेच्या हा फक्त मुलींचे लैंगिक शोषण केलेय. त्याशिवाय मुलींना धर्मांतर देखील करायला भाग पाडत होता. यासाठी त्याला मोठी फंडिंग कुठून तरी येत होती, असा खळबळजनक आरोप माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलाय. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस खात्याकडे द्यावा, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.