Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोथळे, भंडारेच्या अटक पंचनाम्यावरील सही, अक्षर माझे नाही!बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेची साक्ष : ऍड. शिरगांवकर यांची माहिती अनिकेत कोथळे खून प्रकरण

कोथळे, भंडारेच्या अटक पंचनाम्यावरील सही, अक्षर माझे नाही!
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेची साक्ष : ऍड. शिरगांवकर यांची माहिती 
अनिकेत कोथळे खून प्रकरण

सांगली : खरा पंचनामा 

चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले अनिकेत कोथळे, अमोल भंडारे यांना अटक केलेल्या पंचनाम्यावर माझी सही नाही तसेच त्यातील अक्षर माझे नाही. माझ्या सहीचा आणि अक्षराचा नमुना तपासणीसाठी न्यायालयात हजर करण्यास तयार असल्याची साक्ष बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याने दिल्याची माहिती बचाव पक्षाचे वकील ऍड. विकास पाटील-शिरगांवकर यांनी दिली. याबाबत दि. 22 एप्रिल रोजी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम कामटे याची उलट तपासणी घेणार आहेत.

ऍड. शिरगांवकर म्हणाले, आजच्या सुनावणीत बचाव पक्षाने साक्षी पुरावा सादर केला. बचाव पक्षाने  माहीताच्या अधिकारान्वये मिळालेले पुरावे न्यायालयात सादर केले व त्यास निशाणी पाडून घेतली. अमोल भंडारे व मयत अनिकेत कोथळे या आरोपींना, युवराज कामटे यांनी अटक करण्यात आलेली नव्हती व तो तपास त्यांचे कडे नव्हता, सदर अटक पंचनाम्यावर, अटक करणारे किंवा तपासा अधिकारी म्हणून युवराज कामटे यांची सही नाही व ते अक्षर सुध्दा त्यांचे नाही असा महत्वाचा पुरावा समोर आणला तसेच युवराज कामटे हे त्यांचे अक्षर व सहीचा नमुना तपासणी कामी न्यायालयात सादर करण्यास तयार आहेत अशी साक्ष दिली.

दि.६ नोव्हेंबर २०१७ रोजीचा अटक पंचनामा, हा युवराज कामटे यांस अडकविण्या साठी पोलिसांनी  तयार केला असून, त्यावर दुसऱ्याचे अक्षर आहे, व सही नाही, असा आरोप ऍड. शिरगांवकर यांनी न्यायालयात केला. गु.र.क्र. २४३/२०१७ हा गुन्हा दाखल होण्यापूर्वी अनिकेत कोथळे यांचा मृतदेह आणण्यासाठी, मिरज पोलीस उप-अधिक्षक ९ पोलीस कर्नचारी यांचे सोबत पोलीस वाहन घेऊन, आंबोली येथे मृतदेह आणण्यासाठी रवाना झाले होते, हे देखील बचाव पक्षाने, सांगली, पोलीस मुख्यालये नियंत्रण कक्षाचे स्टेशन डायरीचे नोंदीं वरून कागदोपत्री पत्री समोर आणले. याशिवाय दि.६ व ७ नोव्हेंबर २०१७ रोजी युवराज कामटे हा मिरज येथील सुत्र संचलनाच् कार्य शाळेत हजर असल्याचा पुरावा  सादर करण्यात आला.

तहसीलदार कार्यालय, मिरज,येथून पंच रवाना झाल्याची व पत्र आवक व जावक अशी कोणतीही नोंद नाही, सबब तहसीलदार कार्यालयातून दोन पंच पाठविण्याचे पत्र हे तपास यंत्रणेने बनावट तयार केले आहे,असे बचाव पक्षाने, समोर आणल्याचे शिरगांवकर यांनी सांगितले. युवराज कामटे यांस गु.र.क्र.२४३/२०१७ चे गुन्ह्यात खोटे अडकवण्यासाठी, तपास यंत्रणेने दोषारोप पत्रामध्ये, कागदोपत्री पुरावा तयार करून दाखल केला, असा गंभीर आरोप बचाव पक्षाने, तपास यंत्रणेवर केला आहे व ते साक्षीद्वारे न्यायालया समोर मांडला.

बचाव पक्षा तर्फे ॲड विकास बा.पाटील-शिरगांवकर,यांनी सदरचा कागदोपत्री पुरावा व युवराज  कामटे यांची घेतलेली साक्ष,यामुळे  सदरचा खटला हा वेगळ्या वळणावर गेला आहे अशी चर्चा चालू आहे. या खटल्याची पुढील सुनावणी, ही दि.२२ एप्रिल रोजी होणार असून, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम हे युवराज कामटे यांचा उलट तपास घेणार आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.