आता सोन्याच्या दागिन्यांवर HIUD Coad अनिवार्य
प्रमाणित दागिन्यांची माहिती मिळणे होणार सोपे
पूजा फडके
सांगली : खरा पंचनामा
भारत सरकारने 23 जून 2021 पासून सोन्याच्या दागिनान्यांवर हॉलमार्क असणे बंधनकारक केले होते. पूर्वी हॉलमार्क केलेल्या सोन्यांच्या दागिन्यांवर चार ते पाच प्रकारची चिन्हे असत. जसे, BIS चा शिक्का, दागिना शुद्धतेचा शिक्का, हॉलमार्क केंद्राचा शिक्का, सोनार किंवा सराफी व्यावसायिकाचा शिक्का, दागिना बनविल्याचे वर्ष. नवीन नियमानुसार 1 एप्रिल 2023 पासून हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर HIUD Coad असणे अनिवार्य आहे.
एचयुआयडी म्हणजे काय
सरकारने सोन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क करणे बंधनकारक केले आहे. त्यातच दागिन्यावर एचयुआयडी कोड असणे बंधनकारक केलेलं आहे. तर आता हॉलमार्क म्हणजे काय तर सोने-चांदीच्या दागिन्यांवर शुद्ध म्हणून लावलेला शिक्का असतो. जो दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देतो. दागिन्यांच्या शुद्धतेची हमी देणारी यंत्रणा म्हणजे BIS (ब्युरो of इंडियन स्टँडर्ड). भारतीय मानक विभाग. मानक म्हणजे गुणवत्तेची पातळी.
दोन ग्रॅमवरील सोन्याच्या दागिन्यांवर किंवा इतर वस्तूवर BIS सोन्याच्या शुद्धतेचा शिक्का व एचयुआयडी कोड असणे बंधनकारक आहे. एचयुआयडी कोड म्हणजे युनिक आयडेंटीफिकेशन. हा सहा अंकी अल्फा न्यूमरिक कोड किंवा नंबर असतो. एचयुआयडीमुळे दागिन्यांची वेगळी ओळख मिळण्यासाठी मदत होते. या कोडमुळे दागिना सहज स्ट्रेस केला जाऊ शकतो. तसेच BIS समजते की दागिन्यात काय बदल झाला आहे. दागिन्यांवर एचयुआयडी कोड लावण्यापूर्वी बीस सगळी माहिती घेते. यामुळे प्रत्येक दागिन्याची माहिती सरकारकडे राहते. एचयुआयडी कोडमुळे सर्व दागिन्यांची माहिती कोणीही पाहू शकते. इंरोइड, अँपल स्टोअरवर BIS care नावाचे अप्लिकेशन स्टोअर आहे त्याद्वारे HUID code टाकून आपण दागिन्याची माहिती पाहू शकतो. HUID code मुळे बनावट दागिन्याची विक्री कमी होईल. चोरी कमी होईल. सर्व दागिन्यांची माहिती सरकारकडे राहील. सोने विक्री करणाऱ्या सोनाराची माहिती सरकारकडं असेल. ग्राहकाला सोने शुद्धतेची माहिती पाहता येईल.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.